क्राईम
मित्राच्या बहिणीच्या हळदीवरुन येताना अनर्थ घडला
- राज्यात भीषण अपघात झाला आहे. जळगावातील सावदा ते पिंपळ रस्त्यावर एका कारला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त कार एका झाडाला धडकल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. शुभम सोनार (वय, २५) मुकेश रायपूरकर (वर, २३) यांच्यासह आणखी एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. हे सर्वजण रावेर शहरात वास्तव्यास होते. तर, या अपघात गंभीर झालेल्या जयश भोई आणि गणेश भोई यांच्यावर जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- हे सर्वजण काल संध्याकाळी सावळ येथील एका मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री उशीरा दोन वाजताच्या सुमारास पुन्हा ते आपल्या कारने घराकडे निघाले. पंरतु, भुसावळकडून सावदा मार्गे रावेरकडे येत असताना त्यांची कार रस्त्यातील एका झाडाला धडकली.
- या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. मात्र, या घटनेत शुभम आणि मुकेश यांच्यासह आणखी एकाचा जणाचा जागीच मृत्यू झाला. तर, जयश आणि गणेश गंभीर जखमी झाले.
- त्यांना त्वरीत जळगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.