महाराष्ट्र

बीड सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवणार?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अलीकडे हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान सरपंच देशमुख यांच्या हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. या प्रकरणात बीडचे राजकीय नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचा आरोप केला जात आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर अद्यापही महायुतीचे खातेवाटप झाले नाही. दरम्यान आता खातेवाटपापूर्वीच मंत्री मुंडे हे सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता बीड हत्याकांड प्रकरण मंत्री मुंडेंना भोवणार असल्याची चर्चा रंगली आहे.

देशमुख हत्या प्रकरणानंतर अवघ्या काहीच दिवसात मंत्री मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, आता मुंडेंचे नाव या हत्या प्रकरणात वारंवार घेतले जात आहे. कारण कराड हे मुंडेंचे अत्यंत जवळचे आहेत. याशिवाय विरोधी पक्षाने मागणी केली तरी देखील कराडवर अद्याप कारवाई करण्यात आलेली आहे.

दरम्यान, आज या प्रकरणावर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणालाही सोडणार नसल्याचा थेट इशारा दिला आहे. 

Related Articles

Back to top button