क्राईम
ब्रेकिंग! माझ्या वडिलांच्या सर्व मारेकऱ्यांना फासावर लटकवा
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. काल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याप्रकरणी मोठी घोषणा केली. संतोष हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. यानंतर संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी मोठी मागणी केली आहे.
मीडियाशी संवाद साधताना वैभवी यांनी वडिलांच्या हत्ये प्रकरणी मोठी मागणी करत टाहो फोडला. माझ्या वडिलांना ज्या प्रकारे मारण्यात आले, तशीच कठोर शिक्षा या आरोपींना व्हावी. आम्ही पोलिस तपासावर समाधानी नाहीत. या प्रकरणी सात आरोपी आहेत, मात्र फक्त चार जणांनाच आतापर्यंत अटक झाली. बाकी आरोपींनाही तात्काळ अटक करण्यात यावी, असेही संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी यांनी सांगितले.