मोठी बातमी! राष्ट्रवादीत पुन्हा महाभूकंप?
जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीका करूनही पक्षाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने भुजबळ यांनी मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे.
ते ओबीसी नेत्यांशी चर्चा करून शरद पवार गटात सामील होणे, भाजपामध्ये जाणे किंवा स्वतःचे ओबीसी संघटन तयार करणे या पर्यायांवर विचार करत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे.
भुजबळ यांनी पक्षातील तीन बड्या नेत्यांवर आरोपांची राळ उडवल्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांची समजूत घालण्यासाठी आलेला नाही. त्यामुळे भुजबळ हे राष्ट्रवादीत एकाकी पडल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर भुजबळ उद्यापर्यंत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भुजबळ आज मुंबईत येणार असून दोन दिवस समर्थकांशी चर्चा करूनच निर्णय ते घेणार आहेत. त्यामुळे अजितदादा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.