हवामान
बिग ब्रेकिंग! राज्यात थंडीची लाट उसळणार
- सोलापूर जिल्ह्यात सध्या थंडीची लाट जाणवत आहे. यामुळे नागरिक कुडकुडत आहेत. रात्री जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे रात्री रस्त्यावरील गर्दी कमी दिसत आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे.
- भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार राज्याच्या अंतर्गत भागात सध्या अनेक ठिकाणी तापमान ११ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. किमान तापमान आणखी खाली जाऊ शकते. पहाटे तापमानात मोठी घट होण्याची शक्यता असून विशेषत: जे त्यांच्या कामासाठी बाहेर असतील. त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन होसाळीकार यांनी केले आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र वगळता येत्या २४ तासांत किमान तापमान ८ ते १४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.