महाराष्ट्र
ब्रेकिंग! लाडक्या बहिणींना सरकारचे डबल गिफ्ट
- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिलं आहे. या दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या असून, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- याशिवाय, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते आणि पूल बांधणीसाठी 1500 कोटी, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1212 कोटी, आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या 1400 कोटी रुपयांसोबत अन्नपूर्णा योजनेसाठी मंजूर 514 कोटी रुपयांची तरतूद ही लाडक्या बहिणींसाठी सरकारचे दुहेरी गिफ्ट मानले जात आहे.