हवामान

ब्रेकिंग! बोचऱ्या थंडीने हातपाय सुन्न

सोलापूर जिल्ह्यात सध्या थंडीची लाट जाणवत आहे. यामुळे नागरिक कुडकुडत आहेत. रात्री जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे रात्री रस्त्यावरील गर्दी कमी दिसत आहे. राज्यात आधीच तापमान कमी झाले आहे. त्यातच आता कुडकुडायला लावणारी थंडी राज्यात पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण आता यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाच्या नोंदींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यात थंडीची लाट येण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राज्यात येत्या काही दिवसात आणखी तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या राज्यात 11 ते 14 अंशांपर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान, हे तापमान आणखी खाली जाऊ शकते, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय राज्यात काही ठिकाणी थंडीची लाटदेखील येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता वाढली असून राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र वगळता येत्या 24 तासांत किमान तापमान 8 ते 14 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button