महाराष्ट्र

IPS अधिकाऱ्याची पत्नी आमदार मेघना बोर्डीकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी

  • महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला आहे. या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींना स्थान देण्यात आले आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांची नावे आहेत.
  • परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघाच्या मेघना या आमदार असून, त्या एक उद्योजिका आहे. पीडीसीसी बँकेच्या (परभणी) संचालक आहेत. IPS अधिकारी दीपक साकोरे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांची मुले लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत.
  • मेघना यांनी डीवाय पाटील विद्यापीठ (पुणे) मधून बीएससी कॉम्प्युटर आणि इंटरनॅशनल स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी परभणी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये पाणी आणि पर्यावरण संवर्धन महिला आणि युवकांसाठी रोजगार कार्यक्रम निर्माण करणे, वंचित मुलांना शिक्षण देणे आणि दारू व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन कार्यक्रम चालवणे, परभणीला शाश्वत विकास लक्ष्यांकडे नेणे यांचा समावेश आहे. 

Related Articles

Back to top button