मनोरंजन

मोठी बातमी! अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीचा छापा

  • बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आला असून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. जुहू येथील घरावर ही छापेमारी करण्यात आली असून पॉर्नोग्राफी प्रकरणी ही छापेमारी सुरू आहे.
  • ईडीच्या टीमने पॉर्नोग्राफी प्रकरणी एकूण 15 ठिकाणी छापेमारी केली असून अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्रा यांना जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. पॉर्नोग्राफी प्रकरणात कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी केला असून दोन महिने तुरुंगावास भोगल्यानंतर कुंद्राला सप्टेंबर 2021 मध्ये सिटी कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर तुरूंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर कुंद्राने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.
  • दरम्यान, ईडीकडून आज करण्यात येत असलेल्या छापेमारी ही कुंद्रा याच्या जुहू येथील घर, कार्यालय आणि अन्य ठिकाणांवर करण्यात येत आहे. याशिवाय जवळच्या नातेवाईकांच्या घरांवरही छापेमारी झाली आहे.

Related Articles

Back to top button