ब्रेकिंग! मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झाला का?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आली. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. भाजपचा मुख्यमंत्री होणार इतके मात्र सध्या निश्चित दिसत आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे, देवेद्र फडणवीस आणि अजितदादा पवार उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली याची तपशीलवार माहिती अजून समोर आलेली नाही.
या महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेले शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अमित शहांसोबतची बैठक सकारात्मक झाली. येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय होईल, अशी माहिती शिंदे यांनी बैठकीनंतर दिली. कोणतीही नाराजी नसून आम्ही तिघे एकत्र काम करणार असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.