महाराष्ट्र

ब्रेकिंग! शिंदेंचा उतरलेला चेहरा, राऊतांचे दोनच शब्दात वार

  • राज्यात मुख्यमंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रि‍पदासाठी दावेदार नाहीत. काल दिल्लीत महायुतीच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेसाठी 12 मंत्रि‍पदांची मागणी केली आहे. यामध्ये विधान परिषदेचे सभापतीपद, गृह आणि नगरविकाससह महत्वांच्या खात्यांची मागणी केली आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
  • राऊत म्हणाले की, महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे, तरी देखील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी इतके दिवस लागत आहेत. मुख्यमंत्री ठरला असेल तर त्याचे स्वागत करू. निकाल मान्य नसेल तरी आकडे महत्वाचे असतात.
  • एकनाथ शिंदे संरक्षण मंत्रीपद मागू शकतात. ते राष्ट्रपती अन् उपराष्ट्रपतीपद देखील मागू शकतात. मात्र, दिल्लीने डोळे वटारले तर शिंदेंकडे काही पर्याय नसेल, अशी टीका राऊत यांनी केली. मागण्या पूर्ण झाल्या नाही, तरी शिंदे सरकारमध्ये पडून राहतील, असा घणाघात राऊत यांनी केला.

Related Articles

Back to top button