क्राईम
ब्रेकिंग! शिवशाही बस उलटून भीषण अपघात
राज्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी ते गोंदिया रोडवर शिवशाही बसचा अपघात झाला. शिवशाही बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. 30 ते 35 लोक जखमी असल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातातील मृतांना तातडीने दहा लाख रुपयांची मदत द्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिले आहेत.