महाराष्ट्र

ब्रेकिंग! महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल?

  • राजधानी दिल्लीत पार पडलेल्या बैठकीनंतर आज मुंबईत महायुतीच्या महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आल्या होत्या. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार नियोजित दोन्ही बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळगावी मार्गस्थ झाल्याचेही सांगितले जात आहे.
  • मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत शहा यांनी विविध सूचना दिल्या. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते.
  • त्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र, अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली असून आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक नेमकी कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आली आहे, याबाबत कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. मात्र, दोन दिवसानंतर शहांचा फोन आल्यानंतर पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
  • मुंबईत आज महायुतीच्या बैठकीशिवाय शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकही आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही बैठकही पुढे ढकलण्यात आली असून पुढील दोन दिवस महायुतीची बैठक होणार नसल्याचे सांगितले जात आहे. 

Related Articles

Back to top button