बिजनेस
ब्रेकिंग! रेल्वे तिकिटांचे दर वाढणार? खुद्द रेल्वेमंत्र्यांचे संकेत

रेल्वे प्रशासन तुम्हाला तिकीट वाढीचा धक्का देण्याच्या तयारीत आहे. याचे संकेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिले आहेत.यामुळे येणाऱ्या काळात रेल्वेच्या तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वेचा प्रतिकिमी खर्च सुमारे १.१६ रुपये होतो.
मात्र रेल्वे त्यासाठी केवळ ४५ ते ४८ पैसे प्रतिकिमी एवढेच भाडे आकारते. गेल्या वर्षाची आकडेवारी सांगताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, प्रवासी भाड्यावर रेल्वेकडून सुमारे ५९ हजार कोटी रुपये एवढी सब्सिडी देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी सातत्याने पावले उचलली जात आहेत. नवीन रेल्वे गाड्या सुरू करणे व रेल्वेमार्गांचा विस्तार केला जात आहे.
येणाऱ्या काळामध्ये प्रवाशांसाठी अनेक नव्या प्रकारच्या सुविधा आणल्या जात आहेत. ट्रेनच्या भाड्यामध्ये वाढ करण्याचे संकेत देताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात अजूनही निर्णय घेतले जातील. पंतप्रधान मोदींकडे रेल्वेबाबत एक व्यापक दृष्टीकोन असून, मोठ्या रेल्वे स्टेशनसोबतच छोट्या रेल्वे स्टेशनचाही जागतिक पातळीवर विकास करण्यात येणार आहे.