खेळ

ऑलिम्पिक स्टार सायना नेहवाल अन् पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट

भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सात वर्षांचा त्यांचा दीर्घ संसार तुटणार आहे. सायना आणि कश्यप यांनी 14 डिसेंबर 2018 रोजी लग्न केले होते. सायनाने कश्यपपासून वेगळे होण्याचा निर्णय सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केला आहे.

पती कश्यपपासून वेगळे होण्याची घोषणा करताना सायनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

सायनाने पुढे लिहिले, आपण स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती आणि चांगले आरोग्य निवडत आहोत. मी त्या आठवणींसाठी कृतज्ञ आहे आणि भविष्यासाठी फक्त शुभेच्छा देते. सायनाने या कठीण काळात कश्यप आणि तिच्या खासगी आयुष्याला समजून घेतल्याबद्दल आणि त्यांचा आदर केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

Related Articles

Back to top button