- सिनेइंडस्ट्रीत कधी काय होईल सांगता येत नाही. साऊथ इंडस्ट्रीमधून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री मंजुळा श्रुती हिच्यावर तिच्या पतीनेच तिच्यावर चाकूने हल्ला केला. या महिन्याच्या सुरुवातीलाच पत्नी आपल्याला फसवून बंगळुरू येथे राहत असल्याच्या आरोपावरून त्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. मंजुळावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
- अमृतधरे या प्रसिद्ध मालिकेत मंजुळाने काम केले आहे. तिने रिक्षाचालकासोबत प्रेम विवाह केला होता आणि दोघांना दोन मुले आहेत.
- काही वर्षांपूर्वी अमरेश आणि मंजुळा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण सुखी संसारात विघ्न पडले आणि दोघांमध्ये वैवाहिक मतभेद व्हायला सुरुवात झाली. हे मतभेद एवढे वाढले की त्यांच्यात भांडण होत असायची. गुरुवारीच दोघे परत एकदा एकत्र आले होते.
- गुरुवारी एकत्र आल्यानंतर दोघांचा सुखी संसार परत सुरु होतो का, अशी आशा निर्माण झाली होती. पण अमरेशने मुले शाळेत गेल्यानंतर मंजुळावर हल्ला केला. या हल्यात ती गंभीर जखमी झाली. अमरेशने प्रथम पेपर स्प्रे वापरला आणि नंतर तिच्या खांद्यावर, मांडी आणि मानेवर अनेक वेळा वार केले आणि तिचे डोकेसुद्धा भिंतीवर आदळले.
- पोलिसांनी यासंदर्भातील अधिक माहिती दिली आहे. त्यांनी बोलताना म्हटले आहे की, या घटनेनंतर त्यांच्या शेजारचे तिथे आले. त्यांनी भांडण थांबवले आणि तिला व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल केले. हनुमंतनगर पोलीस स्टेशनमध्ये पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आधी मसाला स्प्रे, मग शरीरावर चाकूने वार
