PSI ची मित्राच्या पत्नीवरच वाईट नजर

Admin
2 Min Read
  • पोलीस दलातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक दीपक नीलकंठराव अंकुरकर याने बालपणीच्या मित्राच्या पत्नीवर अत्याचार केला आहे. 
  • विशेष म्हणजे, पीडित महिलेचा पतीही पोलीस दलातच असून तो आरोपीचा जवळचा मित्र आहे. हा प्रकार नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघविला रिसॉर्टमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. पिडीतेने आता तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरुद्ध सबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती आणि आरोपी दीपक यांची मैत्री २००९-१० पासून खूप घट्ट होती. दोघेही गडचिरोली पोलीस दलात शिपाई म्हणून एकत्र कार्यरत होते. २०१७ साली दीपकने विभागीय परीक्षेत यश मिळवून उपनिरीक्षक पद मिळवले. जानेवारी २०२५ मध्ये दीपकने एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून कुटुंबांसमवेत गोव्याला सहलीला जाण्याचे नियोजन केले होते, ज्यात पीडित महिला आणि तिचे कुटुंबही सहभागी झाले होते. याच सहली दरम्यान दीपकने महिलेसोबत असभ्य वर्तन करायला सुरुवात केली. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी दीपक आणि त्याचे काही मित्र त्यांच्या कुटुंबांसह नागपूरजवळील वाघविला रिसॉर्टमध्ये गेले होते. त्यावेळी पीडित महिला एका खोलीत एकटी असताना आरोपी दीपक त्या खोलीत शिरला आणि त्याने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला, असा गंभीर आरोप आहे.
  • या घटनेनंतरही तो महिलेला वारंवार शरीरसुखाची मागणी करत धमकी देत होता, असेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, ३३ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी दीपक विरोधात बलात्कार, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
  • या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने हिंमत करून घडलेली आपबिती आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर दोघांनी मिळून कोंढाळी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात औपचारिक तक्रार नोंदवली. पोलीस सध्या आरोपीचा कसून शोध घेत आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
Share This Article