भाजप नेत्याची मध्यरा‍त्री गोळ्या झाडून हत्या

Admin
1 Min Read
  • भाजप पदाधिकाऱ्याची मध्यरा‍त्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना बिहारच्या पाटणामध्ये घडली आहे. भाजपशी संबंधित दुसऱ्या पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या झाल्याने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शेखपुरा गावातील भाजप पदाधिकारी सुरेंद्र केवट यांच्यावर अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पाटण्यात व्यावसायिक गोपाल खेमका यांच्या हत्येनंतर अवघ्या काही दिवसांत घडल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
  • मिळालेल्या माहितीनुसार, केवट हे बिहटा-सरमेरा महामार्गालगत असलेल्या त्यांच्या शेतावर पाण्याचा पंप बंद करण्यासाठी गेले असताना परतत असताना मध्यरा‍त्री त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बाईकवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून बाईकस्वार फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत केवट यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
  • पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर पशुवैद्यक आणि शेतकरी म्हणून परिचित असलेले केवट हे भाजपचे सक्रिय पदाधिकारी होते.
Share This Article