- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली आहे. गायकवाड हे अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. मात्र गाडीतून उतरल्यानंतर त्यांच्यावर शाही फेक करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना काळं फासल्याचे सांगितले जात आहे.
- गायकवाड हे आज फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ही घटना घडली. कार्यक्रमस्थळी पोहचताच गायकवाड यांच्यासमोर अनेकजण आले. अचानक जमा होत त्यांनी गायकवाड यांच्यावर अक्षरशः शाई पूर्णपणे ओतली. जमावाने गायकवाड यांना काळं फासले. यामुळे अवघ्या काही क्षणात त्या ठिकाणी गदारोळ निर्माण झाला.
- संभाजी ब्रिगेडच्या नावावरुन वाद निर्माण झाला आहे. संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख असल्यावरुन वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. यापूर्वी देखील त्यांनी संभाजी ब्रिगेडला इशारा दिला होता. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचादेखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणदेखील केले होते. गायकवाड हे आज अक्कलकोटमध्ये आल्यानंतर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासले.
संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासले, डोक्यावर ओतली शाई
