ब्रेकिंग! भारताचा मोठा धमाका, सीमेवर थेट ड्रोन हल्ले?

Admin
2 Min Read
  • बंदी घातलेल्या दहशतवादी गट उल्फाने (आय) आज दावा केला की, भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवरील त्यांच्या छावण्यांवर ड्रोन हल्ले केले आहेत. मात्र, भारतीय सशस्त्र दलांकडून या घटनेची पुष्टी झालेली नाही. उल्फा (आय) ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आज पहाटे अनेक छावण्यांवर ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बंदी घातलेल्या संघटनेचा एक वरिष्ठ नेता ठार झाला तर १९ जण जखमी झाले असा दावाही त्यांनी केला आहे.
  • मान्यमानरच्या सागिंग क्षेत्रात उल्फा नावाची दहशतवादी संघटना कार्यरत आहे. भारतीय सेनेने आमच्या शिबिरांवर ड्रोन हल्ले केल्याचा दावा याच संघटनेने केला आहे. उल्फा या संघटनेच्या दाव्यानुसार या ड्रोन हल्ल्यांत एका वरिष्ठ नेत्यासह एकूण 19 लोक जखमी झाले आहेत. भारताच्या संरक्षण दलाचे प्रवत्यांनी मात्र आम्हाला या घटनेबाबत कोणताही माहिती नाही, असे सांगितले आहे. भारतीय लष्कराने ड्रोन हल्ल्यासारख्या कोणत्याही ऑपरेशनची आम्हाला माहिती नाही, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे उल्फा ने भारताच्या ड्रोन हल्ल्यात आमचा एक वरिष्ठ नेताही मारला गेल्याचा दावा केला आहे.
  • युनायटेड लिबरेशन फ्रँट ऑफ आसा अर्थात उल्फा ही एक प्रमुख दहशतवादी संघटना आहे. या संघटनेची स्थापना 1979 साली करण्यात आली होती. परेश बरुआ नावाच्या व्यक्तीने आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेत या संघटनेची स्थापना केली होती. सशस्त्र लढा उभारून आसाम राज्याला स्वायतत्ता मिवळून देणे, हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारने 1990 साली या संघटनेवर बंदी घातली होती.
Share This Article