मनोरंजन
तेलुगू समाजाबाबत वादग्रस्त टिप्पणी
- इंडियन आणि अन्नमय्या सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कस्तुरी शंकरला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी हिंदू मक्कल काचीच्या बैठकीत तेलगू समुदायाच्या वंशाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता कस्तुरीला या वक्तव्यसाठी अटक करण्यात आली आहे.
- हैदराबादमधील गाचीबावली येथून कस्तुरीला चेन्नई पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. आता तिला पुन्हा चेन्नईला नेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ती लपून बसल्यानंतर पोलिस चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये कस्तुरीचा शोध घेत होते. कस्तुरीचा फोनही बंद होता आणि तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
- कस्तुरी यांनी तामिळनाडूतील तेलुगू समुदायाचा वंश राजांची सेवा करणाऱ्या दरबारी लोकांचा असल्याचे सांगितले. या वक्तव्यामुळे अनेकजण संतप्त झाले असून कस्तुरीने समाजाचा आणि वारशाचा अनादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ब्राह्मण अत्याचाराविरोधात आयोजित मेळाव्यात द्रमुक या राजकीय पक्षाविषयी बोलताना तिने हे वक्तव्य केले होते.
- दरम्यान कस्तुरीने 1991 मध्ये ‘आथा उन कोयिलिले’ या चित्रपटातून पदार्पण केल्यापासून तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच तेलुगू चित्रपट सिम्बा आणि तेलुगू टीव्ही शो सीथे रामुडिकी कटनाममध्ये ती दिसली होती.