क्राईम

CID ऑफिसबाहेर बंदोबस्तात वाढ, कार चकवा देत भरधाव वेगाने आत

बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याने आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिकवर आरोप केले जात आहेत. वाल्मिकला अटक करण्यासाठी सरकारवर दबाव होता. वाल्मिक हे धनंजय मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. याप्रकरणी मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी होत आहे. 9 डिसेंबर रोजी देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती.

पुण्यातील सीआयडी कार्यालयात आज वाल्मिकने आत्मसमर्पण केले. यामुळे देशमुख हत्या प्रकरणाला नवीन वळण आले. कार्यकर्त्यांचा जमाव शांत झाला, त्यानंतर बंदोबस्त कमी करण्यात आला. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमधून वाल्मिकला सीआयडी कार्यालयामध्ये दाखल करण्यात आले.

वाल्मिकच्या आत्मसमर्पणाबाबत पोलिसांना कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे सुरक्षा बंदोबस्त कमी करण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील त्या परिसरामधून निघून गेले होते. त्यामुळे आज वाल्मिक हे शरण येतील, अशी शक्यता कमी होती. त्यानंतर मात्र अचानक एका पांढऱ्या रंगाच्या गाडीमधून वाल्मिक येताना दिसला. पोलिसांनी गेटवरच त्याला ताब्यात घेतले अन् सीआयडी कार्यालयात नेले. त्यावेळी वाल्मिकसोबत बीडचे दोन नगरसेवक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button