सोलापूर
सोलापूर! कारच्या धडकेत बाईकवरील तरुणाचा मृत्यू

- सोलापूर (प्रतिनिधी) कारच्या धडकेत दुचाकी वरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी दयानंद कॉलेज चौक येथे घडली.याप्रकरणी धोंडीबा नारायण कवडे (वय-५३, रा.कोटा नगर, जुना विडी घरकुल) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विवेक विजयकुमार गिलडा (वय-३१,रा.स्टेट बँक कॉलनी नंबर १ भवानी पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
- याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा मुलगा किरण कवळे (वय-१८) हा दुचाकी क्रमांक एम.एच.१३.डीएफ.२११२ यावरून प्रियंका चौकाकडून राहत्या घराकडे येत असताना विवेक याच्या ताब्यातील कार क्रमांक एम.एच.१४.एच.डब्ल्यू.३३४४ ही भरधाव वेगाने जात असताना फिर्यादी यांचा मुलगा रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूने दुचाकीवरून येताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून दुचाकीला धडक देऊन गंभीर जखमी होऊन मयत झाला आहे.असे फिर्यादीत नमूद आहे.पुढील तपास पोसई.बामणे हे करीत आहेत.