महाराष्ट्र

कन्फर्म ! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी  बातमी आहे. लाडक्या बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम खात्यात कोणत्या दिवशी जमा होणार याची तारीख ठरली आहे. या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचा लाभ येत्या 29 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमहा दीड हजार रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत.

या योजनेचा तिसरा हप्ता जमा करण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या योजनेतील लाभ वाटपाचा हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांच्या खात्यात लाभ वितरीत केला जाणार आहे.

तसेच जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर होऊनही या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांना देखील या तिसऱ्या हप्यात लाभ दिला जाणार आहे. तिसऱ्या हप्यात एकूण दोन कोटी महिलांना लाभ दिला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

Related Articles

Back to top button