देश - विदेश
ज्याच्या सत्संगात 140 हून अनेक जणांचा जीव गेला तो भोले बाबा आहे तरी कोण?

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे, ज्यामध्ये चेंगराचेंगरीमुळे आतापर्यंत तब्बल अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव परिसरातील हाथरस-एटा सीमेवर असलेल्या फुलराई गावात भोले बाबा उर्फ साकार विश्व हरी महाराज यांचा सत्संग सुरू असताना ही दुर्घटना घडली. या सत्संगात एटा, कासगंज आणि हाथरस जिल्ह्यांतील तसेच आसपासच्या अनेक जिल्ह्यांतील हजारो लोक उपस्थित होते.
या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर अनेक महिला, मुले आणि पुरुषांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भोले बाबा उर्फ नारायण साकार हरी याचा जन्म तत्कालीन एटा जिल्ह्यातील पटियाली तहसीलमधील बहादूरपूर गावात झाला होता.
परिसरातील लोक त्याला त्याच्या खऱ्या नावाऐवजी भोले बाबा उर्फ साकार विश्व हरी या नावाने ओळखतात. जो स्वत: आपण IB मध्ये कार्यरत असल्याचा दावाही करतो. भोले बाबाने नोकरी सोडल्यानंतर प्रवचन देण्यास सुरुवात केली होती. असा दावा केला जातो की 26 वर्षांपूर्वी बाबाने आपली सरकारी नोकरी सोडली आणि धार्मिक प्रवचन देण्यास सुरुवात केली.
भोले बाबाचे पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, दिल्लीसह देशभरात लाखो अनुयायी आहेत. दरम्यान हाथरस येथे झालेल्या भीषण अपघातानंतर सत्संगात प्रवचन देणारा भोले बाबा उर्फ नारायण साकार हरी हा आता नेमका कोठे आहे याच ठावठिकाणा सध्या तरी नाही.