क्राईम
मास्टरमाईंड सोमनाथ गायकवाडची धक्कादायक माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सयाजी गायकवाड, संजीवनी कोमकर (बहिण), गणेश कोमकर (जावई) याच्यासह गणेशचे भाऊ, अनिकेत दुधभाते अशा तब्बल १५ जणांना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
या खून प्रकरणाचा मास्टरमाईंड सोमनाथ गायकवाड असल्याचे समोर आले.
नंतर सोमनाथ, प्रकाश व अनिकेत अशा तिघांनी खूनात महत्वाची भूमिका बजावत कट रचल्याचे तपासात उघड झाले. दरम्यान, या आरोपींकडे गुन्हे शाखेकडून आता सखोल चौकशी केली जात आहे.
तपासा दरम्यान सोमनाथ याने आंदेकर टोळीच संपवायची आहे. या टोळीचे नामोनिशान मिटवायचे आहे, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यावेळी पोलीस अवाक झाले.
दरम्यान, या गुन्ह्यात आरोपींना कोणी मदत केली याबाबत तपास सुरू असून त्या अनुषंगाने काहींची नावे समोर आली आहेत.