राजकीय

विधानसभा निवडणुकीसाठी नितीन गडकरी मैदानात

  • राज्यभर विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात सर्वच राजकीय पक्ष दंग आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मोठे आव्हाने घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. अशातच आगामी विधानसभेच्या अनुषंगाने भाजपने एक जबरदस्त मेगा प्लॅन तयार केला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीची जबाबदारी चार दिग्गज नेत्यांवर सोपवली आहे.
    आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे या चतुर्भुजांवर सोपवली जाणार आहे. दरम्यान येत्या आठवड्याभरात 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती देखील जाहीर होणार आहे. या निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार असल्याची माहिती मिळाली आहे.
    याशिवाय अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, नारायण राणे, रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, भाई गिरकर, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, अशोक नेते, मुरलीधर मोहोळ यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे. तर दुसरीकडे, नितीन हे यंदाच्या निवडणुकीत विशेष प्रचारक म्हणून एक महिना संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button