मनोरंजन

गौतमी पाटीलसोबत घडला भयानक प्रकार!

  • राज्यात गौतमी पाटीलची चांगलीच क्रेझ आहे. आपल्या चाहत्यांसाठी गौतमी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कायम नवनवीन फोटो व्हिडीओ शेअर करत असते. गौतमीला नृत्य सादर करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात बोलावण्यात येते.
  • दरम्यान, दहीहंडी निमित्त गौतमीच्या डान्स शो अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेस गौतमीसोबत एक भयानक प्रकार घडला.
    गौतमीचा कार्यक्रम अचलपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.
  • मनसेच्या या भव्य दहीहंडी उत्सवाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावत या उत्सवात एकच जल्लोषाचे वातावरण तयार केले होते. दरम्यान, यावेळी गौतमीचा कार्यक्रमात आग लागल्याने खळबळ उडाली. मात्र, ही आग लागताना गौतमीच्या बाउंसररने पाहिले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अचानक स्टेजवर आग लागल्याने काही वेळ कार्यक्रम थांबवण्यात आला.

Related Articles

Back to top button