महाराष्ट्र
ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेत शासनाकडून पुन्हा मोठा बदल
लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या नोंदणीचे काम यापुढे आपले सेवा केंद्रातून होणार नाही. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम अंगणवाडी सेविकांद्वारे होणार आहे.
आता या योजनेसाठी नोंदणीचे काम मर्यादित स्वरुपात येत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे राज्य शासनाच्या निर्णयात म्हटले आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांद्वारे अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असे निर्णयात म्हटले आहे.