क्राईम
बाईकच्या धडकेत महिलेचे…
सोलापूर (प्रतिनिधी) दुचाकी क्रं. एमएच.१३. डीझेड. ९९७५ यावरील अज्ञात चालकाने अतिवेगाने वाहन चालून फिर्यादी अंबिका विठ्ठल धुळे (वय-३५, रा.धोत्रेकर वस्ती, भवानी पेठ) यांना धडक देऊन जखमी करत त्यांचे दोन दात पडले आहे.
याप्रकरणी अंबिका धुळे यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यांच्या फिर्यादीवरून वरील क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रघोजी ट्रान्सपोर्ट समोरील रस्त्यावर घडली. याबाबत अलीकडे फिर्याद दाखल झाली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रुपनर हे करीत आहेत.