महाराष्ट्र
ब्रेकिंग! आता गुन्हेगारांची खैर नाही
आगामी विधानसभा निवडणूक आणि गणेशोत्सव आला असतानाच पुन्हा एकदा नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर सिंघम महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तेजस्वी सातपुते यांची बदली करण्यात आली आहे.
सध्या तेजस्वी सातपुते यांच्याकडे बृहन्मुंबईचे पोलीस उपआयुक्त पदाचा पदभार होता. मात्र पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली आहे.
त्यांच्या याशिवाय पुणे शहर उपायुक्त पदाचा पदभार सांभाळणाऱ्या संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंकज देशमुख यांची पुणे ग्रामीण अधीक्षक पदावरून मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.