बिजनेस
खुशखबर! तरुणांना थेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी
देशभरातील तरुणांना आता थेट बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. देशातील बँका पदवीधरांना नोकऱ्या देणार आहे. ही नोकरी अप्रेंटिसच्या स्वरुपात असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
आगामी पाच वर्षांत एक कोटी तरुणांना शीर्ष पाचशे कंपन्यांमध्ये प्रशिक्षण (इंटर्नशिप) देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. यामुळे देशातील कोट्यवधी पदवीधर तरुणांना नोकरी मिळणार आहे. विशिष्ट कौशल्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या अशा इंटर्न्सना बँका दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याची शक्यता आहे.
बँकेत पुढील एक महिन्यात 21 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. तरुणांना बँकिंग कामाचे प्रशिक्षण देण्यात येईल. बँक एका महिन्यात 25 वर्षांखालील पदवीधरांना नोकऱ्या देणार आहे. शिकाऊ उमेदवार म्हणून ही नोकरी असणार आहे.