क्राईम
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी माहिती देताना सांगितले की, काल रात्री ८ वाजता देशमुख यांची गाडी नरखेडपासून परत येत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून आमचा तपास सुरू आहे.
- देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती कळताच राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयाजवळ एकत्र झाले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. ही ‘स्टंटबाजी’ आहे, असा भाजपने आरोप केला. स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली, असा आरोप भाजपचे काटोल मतदारसंघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी केला आहे.