राजकीय
ब्रेकिंग! विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी
- राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची काल सांगता झाली. उद्या मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर फलोदी सट्टाबाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तर, महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. यापूर्वी फलोदी सट्टा बाजाराने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी अंदाज वर्तवला होता. मात्र, हा अंदाज फेल ठरला होता.
- आता फलोदी सट्टा बाजाराने निकालांविषयी भाकीत केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला 288 पैकी 144 ते 152 जागांवर विजय मिळू शकतो. राज्यात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. तर महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर देईल, असा अंदाज आहे. भाजपाला 87 ते 90 जागा मिळू शकतात, असा फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज आहे.