क्राईम
सरपंच गर्लफ्रेंडसोबत जात होता लॉन्ग ड्राईव्हवर, तेवढ्यात बायकोने पकडले रंगेहात
- सरपंचाच्या पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील संबंधित महिलेने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसह रंगेहात पकडल्यानंतर रस्त्यातच गोंधळ घातला. यानंतर सरपंचाच्या पत्नीने त्या महिलेला बेदम मारहाण केली. यावेळी लोकांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली होती.
- व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सरपंच एका महिलेसह कारमध्ये बसलेला दिसत आहे. तर, त्याची पत्नी कारच्या बाहेर उभी आहे. कारमधील महिला आम्ही लग्न करणार असल्याचे बोलत आहे. हे ऐकताच सरपंचाच्या पत्नीला राग अनावर होतो आणि ती शिवीगाळ करण्यास सुरुवात करते. यानंतर कारमधील महिलेला कारमधून बाहेर ओढून तिला बेदम मारहाण करते. सरपंचच्या पत्नीने रस्त्यात घातलेला गोंधळ पाहून लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
- @gharkekalesh या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा वाद. पत्नीने प्रेयसीसोबत लाँग ड्राईव्हला जाताना सरपंच पतीला पकडले. त्यानंतर सरपंचाच्या पत्नीने त्यांच्या गर्लफ्रेन्डला भर रस्त्यात मारहाण केली.