हवामान

ब्रेकिंग! राज्यात येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस

राज्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळला. काल बैल पोळ्याच्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हाहाकार उडाला. सोलापूर आणि नगर जिल्ह्यातही संततधार पावसाने हजेरी लावली. 

परभणी जिल्ह्यातील पाथरीत अतिमुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीत शेतकरी तर कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथे 18 महिन्यांचे मूल पाण्यात वाहून गेले. दरम्यान आता पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा आणि विदर्भावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. तरीही दोन दिवसांत पावसाचा जोर कमी होईल याची शक्यता नाही. आज, उद्या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल. 
विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button