महाराष्ट्र

ब्रेकिंग! सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहिण योजनेला सोलापूरसह जिल्ह्यात विविध जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सरकारकडून या योजनेचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अनेक अडचणी येत आहेत. बँकेमध्ये खाते नसणे, खाते आधार लिंक नसणे या अडचणीमुळे महिलांना अर्ज भरता येत नव्हते. 

त्यात सरकारने 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. परंतु आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबरमध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वा 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. 

आता ही नोंदणी सप्टेंबरही सुरू राहणारआहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे. सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तीन महिन्यांचे एकाचवेळी साडेचार हजार रुपये मिळणार आहेत.

Related Articles

Back to top button