पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून झाला. याळे पुण्यात एकच खळबळ माजली आहे. हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी या प्रकरणात एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात वनराज यांची सख्खी बहीण आणि मेहुणे आहेत. हल्लेखोर वनराज यांच्यावर हल्ला करत होते, त्यावेळी त्याची बहीण संजीवनी गॅलरीत थांबली होती. गॅलरीतून ती हल्लेखोरांना चिथावणी देत असल्याचे आता उघड झाले आहे. मारा, मारा…सोडू नका, अशी चिथावणी वनराज यांच्या बहिणीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी संजीवनी आणि तिचा पती जयंत कोमकर यांनी पोलिस ठाण्यात आकाश परदेशी याच्याशी वाद झाला. त्यावेळी पोलीस ठाण्यात शिवीगाळ केली. हा वाद सोडवण्यासाठी वनराज आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम यांनी मध्यस्थी केली होती. त्यावेळी कोमकर यांनी वनराज यांना धमकी दिली. तू आमच्या दुकानावर कारवाई करण्यास सांगितले आहे. आमच्या पोटावर पाय दिला. तुला आज पोरं बोलावून ठोकणार, असे सूर्यकांत आंदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.