क्राईम
अश्विनीने चार वर्षीय मुलासह घेतला भयंकर निर्णय
राज्यात अलीकडे गुन्हेगारी वाढत आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील एका विवाहितेने आपल्या चार वर्षीय मुलासह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील अश्विनी समाधान ढगे (वय 23) या विवाहितेने आपला चार वर्षाचा मुलगा रियांश समाधान ढगे (वय 4) याच्यासह विहीरीत आत्महत्या केली आहे. मृत अश्विनी हिचे वडील परशराम आबाजी पाटील रा. निळवंडी ता. दिंडोरी यांच्या फिर्यादीनुसार जावई समाधान ढगे याचे बाहेर अनैतिक संबंध होते, त्याला अश्विनी विरोध करत होती. या कारणावरून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद अश्विनीचे वडील परसराम पाटील यांनी दिली आहे.