हवामान
महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यानंतर कच्छच्या किनारी पट्ट्यावर अरबी समुद्रात झेपावेल्यानंतर त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. दरम्यान, पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.