सोलापूर

ब्रेकिंग! जुन्या भांडणाची खुन्नस काढली

सोलापूर (प्रतिनिधी) मागील झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू मस्के, बाळू मस्के, कपिल मस्के (सर्व.रा.थोबडे मळा, जुना देगाव नाका) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आदित्य प्रकाश हिवरे (वय-१९,रा. साठे पाटील वस्ती, जुना देगाव नाका) यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना २८ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास साठे पाटील वस्ती येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे घरामागील गवताचे वाफ्यात थांबले असता, वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादीबरोबर मागील झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ केली. त्यानंतर बाळू मस्के याने त्याच्या हातातील बांबूने फिर्यादीस मारून जखमी केले. पुढील तपास पोसई. पवार हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button