बिजनेस

उर्वरित बहिणींना कधी मिळणार लाभ?

सरकारने अलीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेला सोलापूरसह अन्य भागात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. राज्यातील कोट्यावधी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र काही महिलांना पैसे मिळाले नाहीत.
31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. या महिलांना लवकरच लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केला आहे. त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. ही प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच 31 जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.
आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 42 हजार 823 अर्जाची पडताळणी सुरू आहे. या योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button