खेळ

ब्रेकिंग! पुढील वनडे वर्ल्डकपसाठी सात संघ पात्र

  • पुन्हा एकदा घरच्या मैदानावर वर्ल्डकप खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे विश्वचषकाचे सामने भारतात होणार आहेत. यामध्ये एकूण १० संघ सहभागी होत आहेत. यजमान असल्याने टीम इंडिया आधीच पात्र ठरली आहे. भारतासह ७ संघांनी विश्वचषकात आपले स्थान पक्के केले आहे. 
  • दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत थेट पात्र ठरू शकलेला नाही. पुढील वर्षी होणाऱ्या क्वालिफायरमधून दुसरे-२ संघ निश्चित केले जातील. पण सगळ्यांच्या नजरा भारत आणि पाकिस्तान या संघांवर असणार आहेत. कारण हे दोन्ही संघ एकाच गटात असतील की, वेगळ्या गटात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या २ टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान एकाच गटात होते.
    भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ पात्र ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया १२० गुणांसह चौथ्या, बांगलादेश १२० गुणांसह पाचव्या, पाकिस्तान १२० गुणांसह सहाव्या आणि अफगाणिस्तान ११५ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजने त्यांचे सर्व २४ सामने खेळले असून ८८ गुणांसह ते ८ व्या स्थानावर आहेत. मात्र तो अद्याप पात्र ठरलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button