महाराष्ट्र

ब्रेकिंग! शिंदे सरकारच्या भवितव्याचा उद्या फैसला?

सुप्रीम कोर्टात उद्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा फैसला होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री शिंदे गेलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी पार पडणार आहे. 

या सुनावणीचे वेळापत्रक उद्या ठरण्याची शक्यता आहे. याबरोबरच सर्व पक्षकारांना लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानुसार ठाकरे गट आणि शिंदे गट आपली बाजू मांडणार आहेत. याआधी शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर सुरू असलेली सुनावणी सुरू ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टाकडे विनंती केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत कोर्टानं निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगासमोर पक्षाच्या चिन्हाबाबतचा वाद सुरू आहे.

Related Articles

Back to top button