महाराष्ट्र
लव्ह जिहाद विरोधात हिंदू समाज आक्रमक
लव्ह जिहाद , धर्मांतर, गोहत्या या विरुध्द कठोर कायदा करावा, श्रद्धा वालकर हत्ये प्रकरणी जलद न्यायालयात खटला चालवून अरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी नाशिक शहरात आज सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या विराट मोर्चाला प्रतिसाद मिळाला. नाशिकमधील विविध हिंदू संघटनांनी आज शहरातून मूक मोर्चा काढला.
आफताबने दिल्ली येथे श्रध्दा वालकर हिचे 35 तुकडे करत निघृणपणे हत्या केली. या घटनेने युवतींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिल्लीच नव्हे तर राज्यात लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. त्यामुळे देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेण्यात आला.