सोलापूर

I support धर्मराज काडादी ; सोशल मीडियावर जबरदस्त क्रेझ

 I support धर्मराज काडादी  याची सोशल मीडियावर  जबरदस्त क्रेझ दिसून येत आहे. दरम्यान  उद्योगपतींच्या हट्टा पायी सिध्देश्वर कारखान्याची  चिमणी पाडुन कारखाना बंद पाडण्याचा कोणी विचार केला असेल तर विमानतळावर एकही विमान उतरु देणार  नाही असा इशारा अक्कलकोट बाळासाहेब शिवसेना विधानसभा संघटक प्रा.सुर्यकांत कडबगावकर यानी दिला आहे.           
सोलापूर जिल्ह्यातील शेतक-याना वरदायिनी असलेली सर्वात जुनी व यशस्वीरीत्या चालत असलेली सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना असुन अनेक शेतकरी, कामगार, वाहतुकदार,व्यापारी यांचे कुटुंब चालवत असुन, भरभराटीस आलेला कारखाना असुन ,सुरळीत चाललेला कारखाना आहे शेतकरी विश्वासाने दर वर्षी लाखो टन ऊस गाळपास पाठवतात  इतर कारखान्यापेक्षा ज्यास्त ऊसाला भाव देणारा कारखाना असुन , अनेकवेळा कारखान्याची निवडणुक बिनविरोध झाली आहे हे शेतकरी व सभासद यांच्या विस्वास मुळेच, अनेक कारखाने बंद पडत आहेत. सुरळीत चाललेला कारखाना बंद पाडवा म्हणुन कटकारस्तान करत आहेत. सोलापूरात दुसरे विमानतल मंजुर आहे. तो विमानतळ चालु करावा शेतक-यांचे नुकसान करुन उद्योगपती आपल्या स्वर्था साठी कारखाना बंद पाडत असतील तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही. तशी वेळ आलीच तर विमानतळावर एकही विमान उतरु देणार  नाही, असा इशारा सुर्यकांत कडबगावकर यानी दिला.
लवकरच सपंर्क प्रमुख शिवाजी सावंत जिल्हाप्रमुख मनिष काळजे तालुकाप्रमुख संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,आरोग्य मंत्री डाॅ तानाजी सावंत यांच्या कडे सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडु नये व नविन विमान तु येथे विमान सेवा सुरु करावी, अशी मागणी अक्कलकोट बाळासाहेब शिवसेनेच्यावतीने करणार आहोत, असे कडबगावकर म्हणाले.

Related Articles

Back to top button