सोलापूर

श्रद्धा हत्याकांड प्रकरणात मोठा ट्विस्ट

लिव-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिचा खून केल्याचा आफताब पुनावाला याच्यावर आरोप आहे. श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या शरीराचे 35 तुकडे केले होते. त्यानेतर हेच तुकडे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत हत्या केल्याचे पुरावे मिटवले होते. मे महिन्यात झालेल्या या हत्याकांड प्रकरणानंतर नोव्हेंबर महिन्यात आफताबला अटक करण्यात आली.

देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणाचं गूढ अजून कायम आहे. दिवसेंदिवस या हत्याकांड प्रकरणाशी संबंधित नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आहे. म्हणजे या व्यक्तीनेच आफताबला हत्येचे पुरावे मिटवून टाकण्यासाठी मदत केली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तिसऱ्या व्यक्तीचं नाव या हत्याकांडाशी जोडलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीने आफताबला याला मदत का केली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Related Articles

Back to top button