सोलापूर

मोठी घडामोड ; कन्नड वेदिके संघटनेची महाराष्ट्रात घुसखोरी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अक्कलकोट, जत आणि सोलापूरवर दावा ठोकल्यानंतर सीमावादाचा प्रश्न पेटला आहे. कर्नाटकच्या सीमेलगत असलेल्या तिकोंडी आणि उमराणीतील ग्रामस्थांनी सभा घेत आमच्या समस्या सोडवा नाही तर आम्ही कर्नाटकमध्ये सामील होऊ, असा इशारा महाराष्ट्र सरकारला दिल्यानंतर आता कर्नाटकातील कन्नड वेदिके संघटनेने तिकोंडी आणि उमराणी गावात कर्नाटकचा ध्वज फडकावला आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिकोंडी आणि उमराणीतील गावकऱ्यांची भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्र सरकारवर नाराज असलेल्या दोन्ही गावातील लोकांनी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत केले. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर एकत्र होत महाराष्ट्र सरकारचा निषेध करत कानडी ध्वज फडकावला.
त्यानंतर दोन्ही गावातील ग्रामस्थांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात सामील होण्याची इच्छा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलून दाखवली.

Related Articles

Back to top button