सोलापूर

शिंदे गटाच्या आमदाराला ग्रामस्थांनी गावाबाहेर हाकलले

शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर अनेक आमदारांनी ठाकरे गटाला दणका दिला. ठाकरे गटातून अनेक जण शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे वैजापूर गंगापूर मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार रमेश बोरनारे यांना ग्रामस्थांचा रोष पत्कारावा लागला. महालगावातून त्यांना ग्रामस्थांनी हाकलून दिल्याची घटना समोर आली आहे.

बोरनारे एका कार्यक्रमासाठी वैजापुरातील महालगावात गेले होते. त्यावेळी त्यांना ग्रामस्थांनी गावात येण्यापासून रोखलं. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला. बोरनारे यांनी गावाचा प्रवेश करण्यापासून ग्रामस्थांनी रोखल्याने दोन गटांत हाणामारी झाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे प्रकरण आणखी वाढू नये, याकरता बोरनारेंनी महालगावातून पाय काढला.
बोरनारे हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे नेते आरएम वाणी यांचे ते निकवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने वैजापुरात रोष निर्माण झाला आहे.

Related Articles

Back to top button