देश - विदेश

बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा

  • बिहार पोलीस दलातील ‘सुपरकॉप व सिंघम’ अशी उपमा मिळालेले मराठमोळे, धडाकेबाज आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर बिहारमध्येच राहण्याचा त्यांचा विचार असून विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या तिकिटावर ते पाटणा शहरातून २०२५ ची विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे.
    निवडणूक प्रचाराच्या नियोजनात चाणक्य समजल्या जाणाऱ्या व अनेक निवडणुकांमध्ये मोठमोठ्या पक्षांसाठी काम करणारे किशोर यांनी काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जनसुराज अभियान सुरू केले आहे. येत्या २ ऑक्टोबरला गांधी जयंतीचं औचित्य साधून ते नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. याच पक्षात शिवदीप प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.
    शिवदीप हे बिहार केडरचे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून बिहारमधील अनेक जिल्ह्यांत त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. ते आपल्या कठोर प्रतिमेसाठी ओळखले जातात. आज दुपारी त्यांनी सोशल मीडिया साइट फेसबुकवर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

Related Articles

Back to top button